Queen Elizabeth: नेहरूंपासून मोदींपर्यंत, अशा होत्या राणी एलिझाबेथ यांच्या भारतभेटी

Home » Queen Elizabeth: नेहरूंपासून मोदींपर्यंत, अशा होत्या राणी एलिझाबेथ यांच्या भारतभेटी
Queen Elizabeth: नेहरूंपासून मोदींपर्यंत, अशा होत्या राणी एलिझाबेथ यांच्या भारतभेटी

ब्रिटनवर तब्बल 70 वर्ष राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या महाराणी ठरल्या. भारताशीही त्यांचं नातं खास असं होतं. या महाराणीने तब्बल तीन वेळा भारताला भेट दिली होती. त्यावेळी भारताचं आदरातिथ्य पाहून त्या भारावून गेल्या होत्या. 1961, 1983 आणि 1997 मध्ये ते भारत भेटीवर आले होत्या. त्यांच्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी ताजमहालला भेट दिली तसेच महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.21 जानेवारी 1961 रोजी ब्रिटीश राजघराण्याच्या वंशज या नात्याने महाराणी एलिझाबेथ यांनी स्वतंत्र भारताला पहिली भेट दिली होती. भारताचे पाहुणे म्हणून आलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे भारतात शाही स्वागत करण्यात आले. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीतील पालम विमानतळावर उपस्थित होते.Recommended Articlesबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ11 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या14 minutes agoदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा! राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप17 minutes agoपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी ‘PFI’ कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. 21 minutes agoया महाराणीला पाहण्यासाठी लाखो लोकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर गर्दी केली होती. त्यांचं स्वागत करताना भारतीय लोकांनी हातात ब्रिटन आणि भारताचे झेंडे घेत त्यांच्या नावाचा जयघोष चालवला होता.त्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला हजेरी लावली. त्यांनी राजघाटाला भेट देऊन भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर जगातील 7 वं आश्चर्य असलेला ताजमहाल पाहण्यासाठी हे शाही जोडपं आग्र्याला गेलं. याशिवाय त्यांनी तत्कालीन बॉम्बे (मुंबई), बनारस (वाराणसी), उदयपूर, जयपूर, बंगलोर (बेंगळुरू),मद्रास (चेन्नई) आणि कलकत्ता (कोलकाता) या शहरांनाही भेटी दिल्या.भारतभेटीवर आलेल्या या महाराणींना कुतुबमिनारचे कलात्मक मॉडेल भेट देण्यात आले तर प्रिन्स फिलिप यांना चांदीचा मेणबत्ती स्टँड देण्यात आला.दुसऱ्या दौऱ्यात मदर तेरेसा यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ सन्मानब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी 1983 मध्ये भारताला दुसरी भेट दिली. नऊ दिवसांच्या या दौऱ्यात महाराणींनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रिटनच्या महाराणी भारतभेटीवर आल्या होत्या.महाराणींचं आगमन एखाद्या सणापेक्षा कमी नव्हतं. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस 6 महिन्यांत बांधून पूर्ण करण्यात आले. महाराणीच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजशिष्टाचार शिकवण्यात आले. राणी भारतीय अन्न खात नसल्यामुळे तिच्या आवडीनुसार अन्न शिजवण्यासाठी खास शेफ नेमण्यात आले.बातम्यांमध्ये तर सर्वत्र महाराणी एलिझाबेथच्याच चर्चा होत्या. त्यांनी कोणता ड्रेस परिधान केलाय, त्यांच्या ड्रेसचा रंग कोणता होता? गाऊन कुठून शिवून घेतला ? असे मथळे असलेल्या बातम्या त्यावेळच्या टॉपच्या वृत्तपत्रात छापून येत होत्या.महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भारताच्या दुसर्‍या भेटीत मदर तेरेसा यांना ब्रिटीश राजदरबाराने आयोजित केलेल्या समारंभात ऑर्डर ऑफ मेरिट देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य, कला, कला, विज्ञान आणि सैन्यात चांगले काम करणाऱ्यांना हा सन्मान दिला जातो.1983 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी ब्रिटीश शाही जोडप्याचे स्वागत केले होते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्या आगमनानिमित्त राष्ट्रपती भवनात भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता.महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची शेवटची भारत भेट..1997 मध्ये त्यांनी शेवटचा भारत दौरा केला. त्या 13 ऑक्टोबरला पती प्रिन्स फिलिपसोबत भारतात आल्या. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्यांचे स्वागत केले. हा दौरा सुद्धा संस्मरणीय ठरला, कारण याच वर्षी ब्रिटनपासून भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. भारताच्या या आनंदात सामील होण्यासाठी ब्रिटनची महाराणी आल्या होत्या.आपल्या शेवटच्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली. यादरम्यान त्यांनी पायात चप्पल न घालता, पांढरे मोजे घालून गुरुद्वारात प्रवेश केला.महाराणीच्या या भेटीचीही खूप चर्चा रंगली. कारण त्यांनी अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. असं करणाऱ्या त्या ब्रिटिश राजघराण्यातील पहिल्या व्यक्ती होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ”2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूके दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय सोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला.” असा किस्सा त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितला आहेमहाराणीला भारताच्या आदरातिथ्याबद्दल आकर्षण होतं..जागतिक नेत्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आयोजित केलेल्या भव्य मेजवानीच्या वेळी, त्यांनी भारताचं कौतुक केलं. त्या म्हटल्या होत्या, ‘प्रिन्स फिलिप आणि माझ्या भारत भेटीच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. भारतीय लोकांचा आदरातिथ्य आणि भारतीय लोकांचे प्रेम, त्यांची विविधता सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.’